Sunday, October 06, 2024 04:33:48 AM

आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी कार्यकर्त्यांचा पोलिसांशी समन्वय

आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी कार्यकर्त्यांचा पोलिसांशी समन्वय

मुंबई, ८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबईतील गणेशोत्सवाचे स्वरूप खूप मोठे असते. लहान-मोठ्या गणेशोत्सव मंडळांतही गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते. तसेच आगमन-विसर्जनावेळीही प्रचंड गर्दी असते. अशावेळी बॉम्बस्फोटसदृश स्थिती किंवा दहशतवादी हल्ल्याचा धोका असतो. अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तिला तोंड देण्यासाठी पोलिसांना मदत म्हणून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या एकूण एक लाख गणसेवकांची फौज तयार केली जाणार आहे. प्रत्येक मंडळातील नियुक्त कार्यकर्ते पोलिसांशी वेळोवळी समन्वय ठेवतील. या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून गणेशोत्सवाआधी सुरक्षिततेविषयी मार्गदर्शनही मिळणार आहे.

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीसोबत एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये सुरक्षिततेविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासह गेल्या वर्षी कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाया मागे घेणे इत्यादी मुद्यांचा समावेश होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांना सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन केल्यानंतर प्रत्येक छोट्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील दहा आणि मोठ्या मंडळातील २० कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यांना पोलिसांकडून ओळखपत्रही दिले जाईल. असे त्यांनी बैठकीदरम्यान सांगितले.

या मुद्यांवर चर्चा

  • मुंबईतील काही भागांतील नादुरुस्त सीसीटीव्ही दुरुस्त केले जातील. तसेच मुंबईतील काही ठिकाणी विसर्जनाला अडथळे ठरणारे सिग्नल याबाबत योग्य काळजी घेतली जाईल.
  • बेवारस वाहनांवर कारवाई केली जाईल.
  • पोलिस तसेच वाहतूक पोलिस विभागाची परवानगी घेताना काही तांत्रिक अडचण आल्यास ते तातडीने सुटतील, याकडे लक्ष दिले जाईल.

सम्बन्धित सामग्री