Monday, September 09, 2024 03:12:30 PM

auction-notice-to-sunny-deol-bungalow-withdrawn
सनी देओल यांच्या बंगल्याचा ई - लिलाव स्थगित

सनी देओल यांच्या बंगल्याचा ई - लिलाव स्थगित

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : गुरुदासपूरचे खासदार आणि बॉलिवूड अभिनेते सनी देओल यांच्या मुंबईत जुहू परिसरात असलेल्या बंगल्याचा लिलाव होणार होता. हा लिलाव आता स्थगित करण्यात आला आहे. सनी देओल यांनी बँक ऑफ बडोदाकडून जुहूच्या बंगल्यासाठी कर्ज घेतले होते. या कर्जाची डिसेंबर २०२२ पासूनची ५५.९९ कोटी रुपये एवढी रक्कम थकीत होती. कर्जाची परतफेड थांबली होती. याच कारणामुळे बँक ऑफ बडोदाने बंगल्याचा ई - लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रक्रियेतून बँक कर्जाची थकीत रक्कम वसूल करणार होती. पण ही लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. आधी लिलावाची नोटीस काढणाऱ्या बँक ऑफ बडोदाने आता तांत्रिक कारण देत लिलाव प्रक्रिया स्थगित केली आहे. बँक ऑफ बडोदा जुहूच्या सनी व्हिला आणि सनी साउंड्स या दोन मालमत्तांचा ई - लिलाव करणार होती. एकूण ५९९.४४ चौ. मीटर मालमत्तेचा लिलाव करून थकीत कर्जाची वसुली केली जाणार होती. पण तांत्रिक कारण देत बँक ऑफ बडोदाने ही लिलाव प्रक्रिया स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. https://twitter.com/Jairam_Ramesh/status/1693461565679546712 काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बँक ऑफ बडोदाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. नोटीस निघेपर्यंत देशाला जूहू येथे सनी देओल यांची मालमत्ता असल्याचे माहिती नव्हते. आता ते कळले आणि मालमत्तेवरील कर्जाची रक्कम थकीत असल्याचेही समजले. पण अचानक कर्जाच्या वसुलीसाठी होणार असलेला ई - लिलाव थांबवण्यात आला आहे. बँकेने तांत्रिक कारण देत ई - लिलाव थांबवला आहे. पण हे तांत्रिक कारण म्हणजे काय हे अद्याप समजलेले नाही; असे मतप्रदर्शन जयराम रमेश यांनी केले आहे.


सम्बन्धित सामग्री