Monday, September 16, 2024 06:40:11 PM

पावसाची कविता आणि संकर्षण ची आठवण काय आहे नक्की गंमत ऐका अमृता कडून !

पावसाची कविता आणि संकर्षण ची आठवण काय आहे नक्की गंमत ऐका अमृता कडून

 

सध्या अमृता झी मराठीवर ड्रामा ज्युनियर या शोच जजिंग करत आहे आणि तिचा सहसोबती संकर्षण नाटकाच्या दौरयावर आहे म्हणून सेटवर अमृता आणि श्रेया संकर्षण ला किती मिस करतात याची एक झलक अमृताने तिच्या रिल मधून दाखवली आहे. संकर्षण हा उत्तम कविता करतो आणि आता अमृता तिच्या या कवी मनाच्या मित्राला खूप मिस करते हे या रिल मधून बघायला मिळतंय. 

https://www.instagram.com/reel/C9t69etNi-N/?igsh=MWFtY2JzbDQ4cDV1YQ==

अमृता या बद्दल बोलताना सांगते " सेटवर एखादा व्यक्ती कमी असला तरी त्याला आम्ही सगळेच मिस करतो मग ते अगदी सेटवरच्या क्रू पासून मी श्रेया आणि आमची लहानगी मंडळी सगळेच एकमेकांना मिस करतात. सध्या आमचा कवी मनाचा जिवलग मित्र संकर्षण त्याचा नाटकांच्या निमित्ताने परदेशवारी करतोय आणि आता आम्ही त्याला खूप मिस करतोय म्हणून त्याचासाठी ही खास रिल आम्ही केली आहे. संकर्षण आता हा व्हिडिओ बघून तरी लवकर ये रे" 

अमृता कायम तिच्या सोशल मीडिया वरून सेटवरच्या अनेक धम्माल गोष्टी शेयर करत असते आणि हा व्हिडिओ देखील तितकाच खास आहे. अमृता या शो च्या निमित्ताने सेटवर अनेक तिच्या लहानग्या मुला सोबत जोडली गेली आहे. 

अमृताने 2024 वर्षाची दमदार केली आहे आणि येणाऱ्या काळात देखील ती अजून उत्तोमतोम चित्रपटात दिसणार आहे. हिंदी आणि मराठीत अमृता आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून देत असून आता येणाऱ्या काळात ती काय नवीन घेऊन येणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
 


सम्बन्धित सामग्री