Tuesday, September 17, 2024 12:59:35 AM

अभिनेत्री संस्कृती 'ह्या' नव्या फोटोजमुळे पुन्हा चर्चेत!

मराठी सिनेसृष्टित प्रसिद्ध असलेली आणि आपल्या नाविन्यपूर्ण कलागुणांनी चर्चेत असणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे कायम वैविध्यपूर्ण गोष्टी करत असते

अभिनेत्री संस्कृती ह्या नव्या फोटोजमुळे पुन्हा चर्चेत 

 

मराठी सिनेसृष्टित प्रसिद्ध असलेली आणि आपल्या नाविन्यपूर्ण कलागुणांनी चर्चेत असणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे कायम वैविध्यपूर्ण गोष्टी करत असते आणि समाज माध्यमांद्वारे

आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन गोष्टी तिचे मनमोहक अंदाजातील शूट चाहत्यांसमोर आणून कायम चर्चेत असताना पहायला मिळते. 

नुकतच तिने एक नवं कोर फोटो शूट केलं. संस्कृती ने शॉर्ट हेअर सोबत हा नवा लूक फ्लौंट करून हे खास फोटो शूट केल्याचं दिसतंय. हे शूट समाज माध्यमांवर जोरदार चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय  ह्या शूटबद्दल सांगयच तर व्हाइट रोज आणि संस्कृतीचा क्लासी अंदाज यातून अनुभवयाला मिळतोय.
 त्याचबरोबर काही नेटकऱ्यांनी संस्कृतीच्या बोल्ड शूटवर एकाने फुलराणी तर दुसऱ्याने खूबसूरत, तुम को शुभकामनाएं, अश्या टिपण्या केल्या आहेत. 


 


सम्बन्धित सामग्री