Tuesday, July 16, 2024 09:36:22 PM
20
गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केला.
Tuesday, July 16 2024 02:19:46 PM
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तीन आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठाने जामीन दिला.
Tuesday, July 16 2024 01:03:03 PM
राशपचे शरद पवार आणि राज्य शासनाचे मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे दोघेही नाशिक दौरा करत आहेत.
Tuesday, July 16 2024 11:18:44 AM
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनाला निघालेल्यांच्या बसला अपघात झाला. मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर बस आणि ट्रॅक्टर यांची धडक झाली.
Tuesday, July 16 2024 10:45:36 AM
सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी झाली
Tuesday, July 16 2024 10:09:42 AM
विकासशील इंसान पार्टीचे प्रमुख बिहार सरकारचे माजी मंत्री मुकेश साहनी यांचे वडील जीतन साहनी यांची हत्या झाली.
Tuesday, July 16 2024 09:06:09 AM
सुमारे २७ तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे. वाहतूक सुरू झाली तरी सध्या गाड्यांचा वेग कमी आहे.
Monday, July 15 2024 07:17:10 PM
संसदेत १३ डिसेंबर २०२३ रोजी घुसखोरी झाली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने पुरवणी आरोपपत्र सादर केले.
Monday, July 15 2024 06:44:46 PM
विशाळगड येथे दगडफेक आणि तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सुमारे शिवभक्तांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
Monday, July 15 2024 05:17:09 PM
ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या छगन भुजबळांनी राशपच्या शरद पवारांची भेट घेतली.
Monday, July 15 2024 04:48:54 PM
भाजपा नेते राज्यात संवाद यात्रा काढणार. यात्रा राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून जाणार
Monday, July 15 2024 04:31:34 PM
मुसळधार पावसामुळे दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली. रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा आला. यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
Monday, July 15 2024 10:31:14 AM
देशातील सात राज्यांतील १३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने प्रत्येकी चार तर भारतीय जनता पार्टीने दोन जागा जिंकल्या.
Saturday, July 13 2024 09:56:37 PM
मनोज जरांगेंनी राज्यातल्या शिंदे सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. राज्य शासनाकडे जरांगेंनी निवडक मागण्या केल्या आहेत.
Saturday, July 13 2024 09:33:41 PM
मुंबईवर मोदींचे अनंत उपकार आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर पंतप्रधान मोदी विकासपुरुष आणि जनसेवक आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Saturday, July 13 2024 08:37:29 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विकासकामांचं भूमिपूजन करतात त्या विकासकामांचं नंतर उद्घाटन पण करतात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Saturday, July 13 2024 08:13:33 PM
मुंबईला जगाचे शक्तीकेंद्र करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
Saturday, July 13 2024 07:21:19 PM
भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताला २०४८ पर्यंत वाट बघावी लागणार नाही.
Saturday, July 13 2024 04:35:00 PM
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटली. या प्रकरणात काँग्रेसने शुक्रवार १९ जुलै रोजी आमदारांची बैठक बोलावली आहे. बैठकीत मते फुटण्याच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.
Saturday, July 13 2024 03:32:49 PM
देशात दरवर्षी २५ जून रोजी संविधान हत्या दिवस पाळला जाईल.
Friday, July 12 2024 10:13:48 PM
दिन
घन्टा
मिनेट