Sunday, March 23, 2025 08:48:37 PM

पुण्यात डंपरने घेतले ९ जणांचे बळी

मद्यधुंद चालकाने फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडले.

पुण्यात डंपरने घेतले ९ जणांचे बळी

पुणे: पुण्यातून एक धक्कादाय बातमी समोर येत आहे. पुण्याजवळील वाघोली येथील केसनंद फाट्यावर भीषण अपघात घडला. पुण्याकडून येणाऱ्या बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या डंपरने भरधाव वेगात फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन लहान मुले आणि त्यांच्या काकांचा समावेश आहे. सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

ही दुर्दैवी घटना रात्री बाराच्या सुमारास पोलीस ठाण्याजवळच घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. मृतांमध्ये वैभवी रितेश पवार (1 वर्ष), वैभव रितेश पवार (2 वर्ष) आणि रीनेश नितेश पवार (30 वर्ष) यांचा समावेश आहे. जखमींना तत्काळ ससून रुग्णालयात हलविण्यात आले. 

रविवारी रात्री अमरावतीहून मजुरीसाठी आलेल्या एका कुटुंबातील जवळपास बारा जण फुटपाथवर झोपले होते. या परिसरात शंभर ते दीडशे लोक फुटपाथच्या बाजूला झोपड्यांमध्ये राहत होते. हे लोक विविध राज्यांमधून आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतून हाताला काम मिळवण्यासाठी आलेले मजूर होते. अपघातावेळी डंपर चालक दारूच्या नशेत होता. त्याचा डंपरवरून ताबा सुटला आणि हा अपघात घडला. चालकाला वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. डंपरचालकाचे नाव  गजानन शंकर तोट्रे आहे. तो 26 वर्षीय असून तो नांदेडचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन  मेडिकल चाचणीसाठी ससून रुग्णालयात पाठवलं होतं. चाचणीनंतर आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला. 

मृतांची नावं पुढील प्रमाणे :
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष 
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष

जखमींची नावं पुढील प्रमाणे :
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे   
2. रिनिशा विनोद पवार 18  
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे 
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे


सम्बन्धित सामग्री