छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या जिन्सी परिसरात एका औषध विक्रेत्याने अल्पवयीन मुलीसोबत अत्यंत घृणास्पद वर्तन केले. नऊ वर्षांची मुलगी रात्री औषध घेण्यासाठी मोहम्मद मुस्ताक अहमद या नराधमाच्या औषधीच्या दुकानात गेली होती. औषध देण्याऐवजी, मुस्ताकने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि कागदाच्या पुठ्ठ्यावर पेनाने अश्लील चित्र काढले. मुलीने याकडे दुर्लक्ष करून औषध मागितले, तरीही मुस्ताकने तिला मोबाईलवर अश्लील चित्र दाखवणे सुरूच ठेवले. यामुळे ती मुलगी खूप घाबरली आणि घरी पळाली. तिने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितल्यावर, कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी मेडिकल दुकानाकडे धाव घेतली. संतप्त जमावाने मुस्ताकला चोप देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सविस्तर बातमीसाठी खालील व्हिडीओ पाहा... 👇👇👇👇👇👇👇👇