कल्याण : कल्याणमधील एका हायप्रोफाइल सोसायटीमध्ये दोन परप्रांतीय कुटुंबांकडून एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
कल्याणमधील योगीधाम परिसरात स्थित अजमेरा हाइट्स इमारतीत दोन परप्रांतीय कुटुंबांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे एक मराठी कुटुंब बेदम मारहाण करण्यात आले. दोन कुटुंबांनी लोखंडी रॉडचा वापर करत धीरज देशमुख आणि त्याच्या कुटुंबाला मारहाण केली होती. विशेष म्हणजे या हल्ल्याच्या वेळी बाहेरून माणसे मागवून घरात घुसून मारहाण करण्यात आली. यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं आणि त्याचे पडसाद विधानसभेत देखील उमटले.
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे, ज्यामध्ये मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्ला, सुमित जाधव, दर्शन बोराडे, पार्थ जाधव आणि विवेक जाधव यांचा समावेश आहे. त्यानंतर कल्याण न्यायालयात आरोपींना हजर केल्यानंतर शुक्ला कुटुंबाच्या वकिलांना विरोध करण्यात येत आहे. मराठी वकिलांनी निर्णय घेतला आहे की, शुक्ला कुटुंबाचे वकिलीपत्र कोणीही घेऊनये. यामुळे शुक्ला कुटुंबाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रकरणावर काय बोले देवेंद्र फडणवीस?
या प्रकरणावर विधानसभेत बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा कायम राखण्यावर भर दिला. ते म्हणाले, "महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठी माणसांची भूमी आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे इथे देशभरातून लोक येतात आणि एकत्र राहतात. अनेकजण मराठी सण साजरे करतात, मात्र काही लोकांच्या वागण्यामुळे सामाजिक सलोख्याला धक्का लागतो."
फडणवीस यांनी यावर पुढे सांगितले की, संविधानाने प्रत्येकाला जेवणाच्या निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे, परंतु अशा प्रकारे इतरांवर बंधन घालण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यांच्यानुसार, अशा भेदभावावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
या प्रकरणानंतर मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला यांचे निलंबन करण्यात आले असून त्याला अटक केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
https://whatsapp.com/channel/0029Va9QJRHFSAt2p8b9Cx3t