Saturday, September 07, 2024 05:02:05 AM

Judicial custody of Manorama Khedkar
मनोरमा खेडकरला न्यायालयीन कोठडी

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्याला बंदूक दाखवत धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

मनोरमा खेडकरला न्यायालयीन कोठडी 

२२ जुलै, २०२४ पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱ्याला बंदूक दाखवत धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. 
पौड पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर यांच्यासह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहाही जणांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे. 
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला मनोरमा खेडकरला अटक केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीसांची चौकशी पूर्ण झाली असे मानून न्यायालयाने मनोरम खेडकरला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.पुण्यातील मुळशी येथील धडवली गावात एक भूखंड ताब्यात घेण्यासाठी शेतकऱ्याला बंदूक दाखवत धमकावल्याचा आरोप मनोरमा खेडकरवर आहे. पुण्यातून पळून गेलेल्या मनोरमा खेडकरला पोलीस शोधत होते. अखेर, पुण्यातील पौड पोलीस ठाण्याच्या पथकाने मनोरमा खेडकरला अटक केली होती. रायगड जिल्ह्यातील महाडमधील हॉटेलमधून मनोरम खेडकरला अटक करण्यात आली होती. 


सम्बन्धित सामग्री