संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून थक्क करणारी घटना समोर आली आहे. भावाने 200 फुटांवरून बहिणीला ढकललं आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
संभाजीनगरमध्ये चुलत बहिणीचे एका तरूणावर प्रेम होते. हे दोघेही लग्न करणार होते. मात्र त्यामुळे कुटुंबाची मानहानी होईल. या विचारातून चुलत बहिणीला 200 फूटावरून ढकलून देणाऱ्या आरोपी ऋषिकेश शेरकरचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डोंगरावरून ढकलून देतानाचा आणि त्यानंतर पळून जाताना दिसून आले आहे. छत्रपती संभाजीनगर मात्र या हत्येने हादरलं आहे.
हेही वाचा : आता मुलींचे केस सुरक्षित नाहीत.. दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अंबड तालुक्यातील शहागडची मुलगी घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवलं होतं.
काकाच्या मुलाने गोड बोलून खावडा डोंगरावर नेलं आणि तिकडून त्याने आपल्या सख्ख्या चुलत बहिणीला खाली ढकलून दिल. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला आहे. ही अल्पवयीन मुलगी १७ वर्षांची आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.