Thursday, June 27, 2024 08:06:31 PM

Suicide
पत्नीच्या मृत्यूनंतर आयपीएस अधिकाऱ्याची आत्महत्या

आसाममध्ये गृहसचिव शिलादित्य चेतिया यांच्या पत्नीचा प्रदीर्घ आजारपणानंतर मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर आयपीएस अधिकारी असलेल्या गृह सचिव शिलादित्य चेतिया यांनी आत्महत्या केली.

पत्नीच्या मृत्यूनंतर आयपीएस अधिकाऱ्याची आत्महत्या

गुवाहाटी : आसाममध्ये गृहसचिव शिलादित्य चेतिया यांच्या पत्नीचा प्रदीर्घ आजारपणानंतर मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर आयपीएस अधिकारी असलेल्या गृह सचिव शिलादित्य चेतिया यांनी आत्महत्या केली. ही घटना गुवाहाटी येथील खासगी रुग्णालयात घडली. पत्नीच्या मृत्यूचे वृत्त कळल्यानंतर गृह सचिव शिलादित्य चेतिया यांनी सरकारी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. राज्याचे गृहसचिव होण्याआधी चेतिया यांनी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) आणि आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून काम केले होते. चेतिया यांच्या पत्नीला ब्रेन ट्युमर झाला होता. काही महिन्यांपासून ती रुग्णालयात होती. 

           

सम्बन्धित सामग्री