Sunday, March 30, 2025 02:50:10 AM

मध्यरात्री व्हॅलेंटाईन साजरा करायला प्रेयसीच्या घरी गेला, कुटुंबानं हात-पाय बांधून मारलं, तरूणाचा मृत्यू

एक तरूण व्हॅलेंटाईन वीक दरम्यान आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला. तेव्हा प्रेयसीच्या कुटुंबियांनी त्या तरूणाची अमानुष मारहाण करून त्याची हत्या केली.

मध्यरात्री व्हॅलेंटाईन साजरा करायला प्रेयसीच्या घरी गेला  कुटुंबानं हात-पाय बांधून मारलं तरूणाचा मृत्यू
मध्यरात्री व्हॅलेंटाईन साजरा करायला प्रेयसीच्या घरी गेला, कुटुंबानं हात-पाय बांधून मारलं, तरूणाचा मृत्यू

सद्या व्हॅलेंटाईन विक सुरू आहे. या विकमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी प्रेमीयुगुल आतूर असतात. असाच एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री तिच्या घरी गेला. तेव्हा त्या प्रियकराला प्रेयसीच्या कुटूंबियांनी पकडून मारहाण केली. या मारहाणीत त्या तरूणाचा मृत्यू झाला आहे.   

ग्वाल्हेरमधील भितरवार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. एक तरूण व्हॅलेंटाईन वीक दरम्यान आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला. तेव्हा प्रेयसीच्या कुटुंबियांनी त्या तरूणाची अमानुष मारहाण करून त्याची हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोद पोलिसांत करण्यात आली आहे.  

शिवपुरी जिल्ह्यातील गजेंद्र बघेल (वय २५) हा आपल्या बहिणीच्या घरी आला होता. रविवारी मध्यरात्री तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. गजेंद्र घरी येणार ही बाब मुलीच्या घरच्यांना आधीच कळाली होती. गजेंद्र घरात पोहोचताच मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला पकडले आणि बेदम मारहाण केली. 

हेही वाचा - दारू प्या आणि सुट्टीवर जा.. जपानच्या कंपनीची अनोखी ऑफर

गजेंद्रच्या प्रेयसीच्या शेजारी राहणारा त्याचा मेहुणा भरत बघेल याला या मारहाणीची माहिती मिळाली. तेव्हा तो घटनास्थळी पोहोचला. गजेंद्रचे हात-पाय बांधून त्याला निर्घृणपणे मारल्याचे त्याला दिसले. त्याने गजेंद्रला तिथून घेऊन जाऊन ग्वाल्हेरच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान गजेंद्रचा मृत्यू झाला. 

हेही वाचा - फाशीचे रुपांतर जन्मठेपेत! आता पॅरोललाही पात्र? बालहत्याकांडातील सीमा गावितबाबत सरकारने भूमिका मांडावी - उच्च न्यायालय

गजेंद्रच्या कुटुंबाने या घटनेनंतर प्रेयसीच्या कुटुंबातील 3 सदस्यांवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी तरूणाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवले आहे. दरम्यान, या घटनेवर स्थानिक लोकही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. दोन्ही कुटुंबे बघेल समाजातील असल्याने समाजातील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


सम्बन्धित सामग्री