Thursday, June 27, 2024 08:10:09 PM

Garbhlinga center destroyed
गर्भलिंग निदान केंद्र उध्वस्त

छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेन मोठी कारवाई केली आहे. शहरातील गारखेडा परिसरात एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये गर्भलिंग निदान करणारे रॅकेट सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे.

गर्भलिंग निदान केंद्र उध्वस्त
crime

छत्रपती संभाजीनगर, १२ मे २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेन मोठी कारवाई केली आहे. शहरातील गारखेडा परिसरात एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये गर्भलिंग निदान करणारे रॅकेट सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे. इंजीनियरिंग करणारी एक तरुणी हे गर्भलिंग निदान केंद्र चालवत होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी महापालिकेच्या पथकाला १२ लाख ७८ हजारांची अधिक रक्कम मिळाली आहे. यासोबतच गर्भलिंग निदान करण्याचे साहित्य देखील मिळाले आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात एकच खळबळ उडाली.


सम्बन्धित सामग्री