Friday, April 11, 2025 10:57:11 PM

छत्रपती संभाजीनगरात बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचे अपहरण – 2 कोटींच्या खंडणीची मागणी

एन-4 परिसरात अपहरणाचा धक्कादायक प्रकार – कारमधून आलेल्या अज्ञातांची कृत्य सीसीटीव्हीत कैद?

छत्रपती संभाजीनगरात बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचे अपहरण – 2 कोटींच्या खंडणीची मागणी
15 मिनिटांतच खंडणीची मागणी – पोलिस तपास सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-4 परिसरात मंगळवारी रात्री 8:45 वाजता बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा 7 वर्षीय मुलगा चैतन्य याचे अपहरण करण्यात आले. दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अज्ञात अपहरणकर्त्यांनी ही धक्कादायक घटना घडवली असून बांधकाम व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चैतन्य आपल्या सोसायटीमध्ये खेळत असताना अचानक काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तीन जणांनी त्याचे अपहरण केले. या घटनेनंतर अवघ्या 15 मिनिटांतच अपहरणकर्त्यांनी सुनील तुपे यांच्याशी संपर्क साधून खंडणीची मागणी केली, यामुळे प्रकरण उघडकीस आले.

तुपे हे प्रसिद्ध बिल्डर असून, त्यांचे भाऊ वरिष्ठ शासकीय अधिकारी आहेत. सुनील आपल्या कुटुंबासह एन-4 सेक्टर एफ-1 मध्ये वास्तव्यास आहेत. घटनेच्या वेळी ते आपल्या दोन्ही मुलांसह सोसायटीत खेळत होते. त्यांच्यासोबत चैतन्यचा लहान भाऊही होता, मात्र चैतन्य सायकलवरून घरापासून एन-4 रस्त्याच्या दिशेने गेला आणि त्याच वेळी ही घटना घडली.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

कसे झाले अपहरण :
मंगळवारी रात्री सुनील तुपे मुलांसोबत सोसायटीत खेळत असताना चैतन्य सायकलवरून रस्त्यावर गेला.
अचानक काळ्या रंगाची कार त्याच्या बाजूला उभी राहिली आणि चालकाच्या मागील बाजूने दोघे जण उतरले.
एकाने चैतन्यला उचलून चालकाच्या डाव्या बाजूने कारमध्ये कोंबले.
दुसऱ्याने चैतन्यची सायकल रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन फेकली.
त्यानंतर अपहरणकर्ते चैतन्यला घेऊन हनुमान चौकाच्या दिशेने वेगाने पसार झाले.
ही घटना समजताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.

👉👉 हे देखील वाचा : गोंदियाच्या रामदेवरा मंदिरात देवचं गेला चोरीला


सम्बन्धित सामग्री