जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात पोलिसांच्या गाडीत लाखोंची रोकड सापडली. पोलिसांच्या गाडीमध्ये १६ लाख १८ हजार रुपये सापडले. या प्रकरणी अमळनेर तालुका प्रशासनाने पंचनामा प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांच्या लाखोंची रोकड कोणी ठेवली होती आणि त्यामागील हेतू जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे.