Canada's ‘biggest' gold heist : कॅनडातील 'सर्वात मोठ्या' सोन्याच्या चोरीतील आरोपी सिमरन प्रीत पनेसरच्या घरावर ईडीने छापा टाकला. टोरंटो पिअर्सन विमानतळावरील सोन्याच्या दरोड्याशी संबंधित एअर कॅनडाच्या माजी व्यवस्थापक सिमरन प्रीत पनेसरच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला.
कॅनडाच्या टोरंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एप्रिल 2023 मध्ये झालेल्या सोन्याच्या दरोड्यात त्याच्या कथित भूमिकेसाठी कॅनडाव्यापी वॉरंटचा सामना करणाऱ्या 32 वर्षीय एअर कॅनडाच्या माजी व्यवस्थापक सिमरन प्रीत पनेसरच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापा टाकला आणि त्याची चौकशी केली. शुक्रवारी सकाळी पंजाबच्या मोहालीतील सेक्टर 79 येथील सिमरन प्रीत पनेसरच्या निवासस्थानी ईडीचे एक पथक पोहोचले.
हेही वाचा - HIV पॉझिटिव्ह व्यक्तीकडून 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण; तब्बल 10 महिने डांबून ठेवण्यात आईचीही साथ
पनेसर भारतात शांत जीवन जगत होता
त्याचे राहण्याचे ठिकाण उघड झाल्यानंतर काही दिवसांनी हा छापा टाकण्यात आला आहे. पनेसर मोहालीमध्ये त्याच्या कुटुंबासह भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी प्रीती पानेसर आहे, जी माजी मिस इंडिया युगांडा, एक गायक आणि एक अभिनेत्री होती. पनेसर सध्या सामान्य जीवन जगत होता. त्याच्या पत्नीच्या आणि कुटुंबाच्या व्यवसायात मदत करत होता.
कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठी सोन्याची चोरी करणारा आरोपी भारतात आहे. शुक्रवारी सकाळी (21 फेब्रुवारी), चंदीगडच्या बाहेर असणाऱ्या त्याच्या निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयाने छापा टाकला. हा छापा सामान्य नव्हता, कारण त्याचा थेट संबंध कॅनडाशी आहे, म्हणजेच कॅनडातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीशी आहे. 20 दशलक्ष डॉलर्स (122 कोटी) किमतीच्या सोन्याच्या चोरीतील कथित भूमिकेसाठी कॅनडाच्या अधिकाऱ्यांना हवा असलेल्या 32 वर्षीय सिमरन प्रीत पनेसरच्या घरी अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणारी केंद्रीय संस्था, ईडी, भारताच्या प्रादेशिक सीमेपलीकडे गुन्ह्याचा तपास करण्याच्या दुर्मीळ घटनेत आरोपी आता भारतात असल्याने या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची (मनी लाँडरिंग) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोने किंवा त्याचे उत्पन्न देशात आले आहे का, याचा तपास करणे हा यामागील हेतू आहे.
टोरंटो पिअर्सन सोन्याची चोरी
17 एप्रिल 2023 रोजी, टोरंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका सुरक्षित साठवण सुविधेतून सोन्याच्या बार वाहून नेणाऱ्या एअर कार्गो कंटेनरची बनावट कागदपत्रे वापरून चोरी करण्यात आली.
चोरी झालेल्या कार्गोमध्ये 400 किलो वजनाचे 6,600 बार 0.9999 शुद्ध सोने होते, ज्याचे मूल्य 20 दशलक्ष कॅनेडियन डॉलर्स (CAD) पेक्षा जास्त होते आणि 2.5 दशलक्ष कॅनेडियन किमतीचे परकीय चलन होते. सोने आणि चलन एअर कॅनडाच्या विमानाने स्वित्झर्लंडमधील झुरिच येथून टोरंटो येथे पोहोचले होते आणि कॅनडाच्या सर्वात मोठ्या शहरातील बँकेत नेण्यात येणार होते.
विमान उतरल्यानंतर काही वेळातच, माल उतरवण्यात आला आणि विमानतळाच्या मालमत्तेवरील एका वेगळ्या ठिकाणी नेण्यात आला. मात्र, एका दिवसानंतर, ते सोने 'बेपत्ता' असल्याची तक्रार पोलिसांना देण्यात आली.
हॉलीवूड स्टाईल पिक्चरसारखी नाट्यमय चोरी
काही दिवसांनंतर, पील पोलिसांनी सिमरन प्रीत पनेसरसह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. डुरांते किंग-मक्लीन, अली रझा, अर्सलान चौधरी, अर्चित ग्रोव्हर, परमपाल सिद्धू, अम्माद चौधरी, अमित जलोटा, प्रशथ परमलिंगम हे पनेसर सोबत असलेले या चोरीतील संशयित साथीदार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनेसर हा चोरीच्या वेळी ब्रॅम्प्टनचा रहिवासी होता, जो एअर कॅनडाचा कर्मचारी होता. तपास सुरू असताना पोलिसांना आढळले की, पनेसर हा एकमेव असा होता, ज्याला या मालवाहतुकीच्या शिपमेंट्समध्ये आवश्यक प्रवेश होता. तसेच पानेसरने सोने असलेल्या येणाऱ्या फ्लाइटची यंत्रणा शोधली आणि त्याच्या हालचालीचा मागोवा घेतल्याचे तपासात आढळून आले. एकदा विमान उतरल्यानंतर अधिकारी म्हणतात की त्याने सोने असलेल्या कंटेनरचा मागोवा घेण्यास सुरुवात केली.
“त्याने एअर कॅनडा कार्गो सिस्टीममध्ये फेरफार केली. एकदा चोरी पूर्ण झाल्यानंतर त्याने पूर्णपणे शोध घेणे थांबवले, असेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांना पनेसरवर आणखी संशय निर्माण झाला, तो म्हणजे गुन्ह्याच्या नंतर काही महिन्यांतच त्याने एअर कॅनडामधील नोकरी सोडली आणि तो गायब झाला. परंतु, जून २०२४ मध्ये पील प्रादेशिक पोलिसांनी जाहीर केले की पानेसरने आत्मसमर्पण करण्यास सहमती दर्शविली आहे. त्या वेळी पानेसरचे वकील ग्रेग लॅफॉन्टेन यांनी ‘सीबीसी’ला सांगितले की, “त्यांचा क्लायंट कॅनडाच्या न्याय व्यवस्थेवर खूप विश्वास ठेवतो. जेव्हा हा खटला संपेल, तेव्हा तो या चुकीच्या कृत्यातून मुक्त झाला असेल,” असे ते म्हणाले. पनेसर कुठे आहे हे न सांगता लॅफॉन्टेन पुढे म्हणाले की, पानेसर कॅनडाला परतण्याच्या तयारीत परदेशातील त्याचे व्यवहार व्यवस्थित करत आहे.
हेही वाचा - 'पप्पांनी मम्मीला मारलं, मग...' 4 वर्षांच्या मुलीने काढलेल्या चित्रामुळे आईच्या खुनाचा उलगडा, पोलिसही अवाक्
सोन्याच्या चोरीतील इतर साथीदार
कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले की, पनेसर हा नऊ व्यक्तींच्या योजनेचाच भाग होता. ज्यामध्ये एअर कॅनडाचा आणखी एक कर्मचारी परमपाल सिद्धू याचा समावेश होता. पील प्रादेशिक पोलिसांचा असा विश्वास आहे की, दोघांनी एकत्र काम केले आणि चोरीला मदत केली. चोरीनंतर सिद्धूला अटक करण्यात आली होती आणि चोरीचा आरोप करण्यात आला होता. सोन्यासह पळून गेलेल्या ट्रकचा ड्रायव्हरही कॅनडाचा नागरिक होता, ज्याचे नाव ड्युरांटे किंग-मॅकलीन आहे. त्याला बेकायदापणे सीमा ओलांडल्यानंतर अमेरिकेत अटक करण्यात आली. तो आता तुरुंगात आहे.
आणखी एक संशयित असणारा अर्चित ग्रोव्हर याला मे 2024 मध्ये अटक करण्यात आली होती. पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला असता, त्याला अटक करण्यात आली होती. ग्रोव्हर हा चोरीत वापरल्या गेलेल्या ट्रकिंग कंपनीचा मालक असल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे. तसेच तो परमपालचा मित्र होता. गुन्ह्यात सामील असलेल्यांमध्ये अमित जलोटा, अम्माद चौधरी, प्रशथ परमलिंगम, अर्सलान चौधरी आणि अली रझा यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. चौधरी वगळता या सर्वांना अटक करण्यात आली आहे. ‘सीबीसी’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे की, चौधरी दुबईत लपून बसला आहे. गुन्ह्याच्या जवळपास दोन वर्षांनंतर, तपासकर्त्यांना चोरीचे असलेले फक्त एक किलोग्रॅम सोने सापडले असल्याचा अंदाज आहे.