मुंबई : सध्याला राज्यभरात बांगलादेशी घुसखोरींबाबतीत जोरदार धरपकड सुरू आहे. अशातच भाजपा नेते किरीट सोमैय्या आणि मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणावर जोर दिला आहे. घाटकोपर पोलिसांनी मोठी कारवाई करत १२ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या झोन सातच्या विशेष पथकाने पथक प्रमुख रेवणसिद्ध ठेंगळे यांच्या नेतृत्वात वर्सोवा येथील खोजा गल्ली परिसरात ही कारवाई केली. विशेष म्हणजे अटक केलेल्या १२ पैकी १० जण हे एकाच कुटुंबातील आहेत. गेले २० वर्षे हे सर्व घुसखोरी करून भारतात राहत होते.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये रोहिमा शहाबुद्दीन खान (४९), शकील कादर शेख (३०), रूखसाना शकील शेख (३५), वहीदुल फैजल खान (४१), जस्मिन वहीदुल खान (३८), सिमरन वहीदुल खान (२०), हसन अब्दुल रशीद खान (६५), आणि अब्दुल आजीज (५५) यांचा समावेश आहे. यात चार महिला, चार पुरुष आणि चार लहान मुलं आहेत.
👉👉 हे देखील वाचा : "महाकुंभ स्नानानंतर अयोध्येत दर्शनासाठी भक्तांची वाढली गर्दी"
या बांगलादेशी नागरिकांकडून पोलिसांनी भारतीय बनावट ओळखपत्रे जप्त केली आहेत, ज्यामध्ये पासपोर्ट, आधार कार्ड, इलेक्शन आयडी, पॅन कार्ड आणि रेशनकार्ड यांचा समावेश आहे. यापूर्वीच विशेष पथकाने १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती, त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
👉👉 हे देखील वाचा : अटल सेतूला प्रवाशांचा प्रतिसाद नाही?