Thursday, February 06, 2025 03:55:17 AM

Baba Siddiqui murder case
झिशान सिद्दिकी यांचा पोलीस जबाबात मोठा दावा

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवे खुलासे. झिशान सिद्दिकी यांचा पोलीस जबाबात मोठा दावा. भाजप नेते मोहित कंबोज, मुंबईतील बिल्डर्सची नावं. हत्येच्या दिवशी सिद्दिकींच्या डायरीत नाव असल्याचा दावा.

झिशान सिद्दिकी यांचा पोलीस जबाबात मोठा दावा

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवे खुलासे समोर आल्याचं पाहायला मिळतंय. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दिकी यांचा पोलीस जबाबात मोठा दावा समोर आलाय. हत्येच्या दिवशी बाबा सिद्दिकींच्या डायरीत भाजप नेता मोहित कंबोज यांचं नाव असून सिद्धीकी यांच्या पोलिस जबाबात अनेक बिल्डर्सची नावे देखील समोर आलीत. पोलिसांच्या आरोपपत्रात बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स या नामांकित विकासकांच्या नावांचा उल्लेख असल्याचं समोर आलंय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

पोलिसांना दिलेल्या जबाबात झिशानने वडिलांच्या हत्येचा संबध हा वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानेच हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आलाय.  दरम्यान पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा पुर्नविकास प्रकल्पाशी कोणतही संबध नसल्याचे म्हटले आहे, तसेच सिद्धीकी यांची हत्या बिष्णोई गँगकडून झाल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय. 

पोलिसांनी आरोपपत्रात बाबा सिद्धीकी यांची हत्या सलमान खान याच्याशी असलेली जवळीकता यातूनच झाल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर माझ्या वडिलांना डायरी लिहायची सवय होती, आणि ज्यादिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांनी लिहिलेल्या डायरीमधे भाजप नेता मोहित कंबोजचंही आहे, असं झिशान सिद्दीकी यांनी पोलीस जबाबात म्हटलं आहे. 


सम्बन्धित सामग्री