Saturday, September 28, 2024 01:44:45 PM

Pune Accident
पुणे अपघातात ३ जणांना पोलीस कोठडी

पुण्यातील अपघातप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांसह एका शिपायाला पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पुणे अपघातात ३ जणांना पोलीस कोठडी

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातात तरुण तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणात रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांसह एका शिपायाला पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांसह शिपाई अतुल घटकांबळेच्या पोलिस कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या पुण्यात पोहोचल्या आहेत. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या अपघात प्रकरणी सुरू असलेल्या पोलीस तपासाची माहिती घेतील आणि पुढील तपासाकरिता आवश्यक ते निर्देश देणार आहेत. 

पुण्यात पोर्शे अपघात
वेदांत अगरवाल - ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी
विशाल अगरवाल, वेदांतचे वडील - ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी
सुरेंद्रकुमार अगरवाल, वेदांतचे आजोबा - ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी
न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे - ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी
आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर - ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी
पोलीस शिपाई अतुल घटकांबळे - ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी


सम्बन्धित सामग्री