Monday, August 26, 2024 03:54:50 PM

Supreme Court
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत काय झाला निर्णय ?

सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी झाली

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत काय झाला निर्णय

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांना देण्यात आले. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाला शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात या विषयावर मंगळवारी सुनावणी झाली. अजित पवार गटाला त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी देण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी ६ ऑगस्ट रोजी ठेवण्याचा निर्णय घेतला. याआधी निवडणूक आयोगाने फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वातील गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे नाव दिले आणि तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले.


Narendra Modi
मोदींचा रविवारी जळगाव दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी महाराष्ट्रातील जळगाव आणि राजस्थानमधील जोधपूरला भेट देणार आहेत.

ROHAN JUVEKAR

मोदींचा रविवारी जळगाव दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी महाराष्ट्रातील जळगाव आणि राजस्थानमधील जोधपूरला भेट देणार आहेत. सकाळी सव्वाअकरा वाजता ते लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत. तर साडेचार वाजण्याच्या सुमाराला जोधपूर येथील राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान महाराष्ट्रात

पंतप्रधान जळगावला भेट देणार असून लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नुकत्याच लखपती बनलेल्या नवीन अकरा लाख लखपती दीदींना ते सन्मानित करणार आहेत. त्यांना प्रमाणपत्र देणार आहेत. याशिवाय ते देशभरातील लखपती दीदींशी संवाद देखील साधणार आहेत.

पंतप्रधान  अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील, ज्याचा लाभ  ४.३ लाख बचत गटातील सुमारे ४८ लाख सदस्यांना होईल. याशिवाय ते पाच हजार कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित करणार आहेत. त्याचा लाभ २.३५ लाख बचत गटातील २५.८ लाख सदस्यांना होईल.

लखपती दीदी योजनेच्या आरंभापासून एक कोटी महिला याआधीच लखपती दीदी झाल्या आहेत. तर तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधानांचा राजस्थान दौरा

पंतप्रधान जोधपूर येथील उच्च न्यायालयाच्या परिसरात आयोजित, राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी समारंभाच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थान उच्च न्यायालय वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन देखील होणार आहे.