Sunday, December 22, 2024 10:55:36 AM

Supriya Sule
'मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही'

राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही

पुणे : राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. याआधी राज्यात मविआची सत्ता आली आणि संधी मिळाली तर राशपकडून मुख्यमंत्री या पदासाठी सुप्रिया सुळेंचे नाव सुवले जाईल अशी चर्चा होती. पण मविआच्या जागावाटपाचे सूत्र जाहीर होण्याआधीच सुप्रिया सुळे यांनी राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे जाहीर केले.

काही दिवसांपूर्वी शिउबाठाचे उद्धव हे सातत्याने मविआतील काँग्रेस आणि राशपच्या नेत्यांकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी करत होते. तर काँग्रेस नेते निवडणूक मविआ म्हणून लढू आणि निकालानंतर नेता ठरवू असे सांगत होते. या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळेंनी राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यामुळे उद्धव यांची अप्रत्यक्षरित्या कोंडी झाली आहे. आता मविआतील घटक पक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 


Maharashtra Cabinate Portfolio Alloacation
अखेर खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती? संपूर्ण यादी!

अखेर आज खातेवाटप जाहीर झालं आहे. कोणत्या मंत्र्यांला कोणतं खातं मिळालं, जाणून घ्या संपूर्ण यादी!

Samruddhi Sawant

अखेर खातेवाटप जाहीर कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती संपूर्ण यादी

नागपूर: देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी 5 डिसेंबरला शपथ घेतला होता, त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. परंतु त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं, आणि विरोधक यावर टीका करत होते. आज अखेर खातेवाटप जाहीर झाल्याने, शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अधिकृत मंत्रालये मिळाली आहेत. 

खातेवाटपाची यादी:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम
अजित पवार - अर्थमंत्रालय, राज्य उत्पादन शुल्क


कॅबिनेट मंत्री:

1. चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
2. राधाकृष्ण विखे पाटील - जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3. हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
4. चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5. गिरीश महाजन - आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास)
6. गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
7. गणेश नाईक - वन
8. दादाजी भुसे - शालेय शिक्षण
9. संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
10. धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11. मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12. उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
13. जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल
14. पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15. अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा
16. अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
17 शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18. आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान
19. दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20. अदिती तटकरे - महिला व बालविकास
21. शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम
22. माणिकराव कोकाटे - कृषी
23. जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
24. नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
25. संजय सावकारे - कापड
26. संजय शिरसाट - सामाजिक न्याय
27. प्रताप सरनाईक - वाहतूक
28. भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन
29. मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
30. नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
31. आकाश फुंडकर - कामगार
32. बाबासाहेब पाटील - सहकार
33. प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers): 
34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम - गृहराज्य शहर
39. पंकज भोयर - गृहनिर्माण



jaimaharashtranews-logo