Thursday, November 21, 2024 11:53:44 AM

Maharashtra Exit Poll 2024
एक्झिट पोलनुसार महायुतीचं पारडं जड

मतदानाची वेळ संपताच राज्यात विधानसभा निवडणुकीत काय होणार याचे अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल जाहीर होण्यास सुरुवात झाली. एक्झिट पोलनुसार महायुतीचं पारडं जड आहे.

एक्झिट पोलनुसार महायुतीचं पारडं जड

मुंबई : मतदानाची वेळ संपताच राज्यात विधानसभा निवडणुकीत काय होणार याचे अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल जाहीर होण्यास सुरुवात झाली. एक्झिट पोलनुसार महायुतीचं पारडं जड आहे. भाजपा हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता एक्झिट पोल व्यक्त करत आहेत. 

मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार 288 पैकी महायुती 150 ते 170 जागा तर मविआ 110 ते 130 जागा जिंकण्याची शक्यता आहे. इतर आठ ते दहा जागा जिंकण्याची शक्यता आहे.

पीएमएआरक्यूच्या एक्झिट पोलनुसार 288 पैकी महायुती 137 ते 157 तर मविआ 126 ते 146 जागा जिंकण्याची शक्यता आहे. इतर दोन ते आठ जागा जिंकण्याची शक्यता आहे.

पीपल्स पल्स एक्झिट पोलनुसार 288 पैकी महायुती 175 ते 195 तर मविआ 85 ते 112 जागा जिंकण्याची शक्यता आहे. इतर सात ते बारा जागा जिंकण्याची शक्यता आहे.

चाणक्य एक्झिट पोलनुसार 288 पैकी महायुती 150 ते 160 तर मविआ 130 ते 138 जागा जिंकण्याची शक्यता आहे. इतर सहा ते आठ जागा जिंकण्याची शक्यता आहे.

पोल डायरी एक्झिट पोलनुसार 288 पैकी महायुती 122 ते 186 तर मविआ 69 ते 121 जागा जिंकण्याची शक्यता आहे. इतर बारा ते 29 जागा जिंकण्याची शक्यता आहे.

भास्कर रिपोर्ट एक्झिट पोलनुसार 288 पैकी महायुती 125 ते 140 तर मविआ 135 ते 150 जागा जिंकण्याची शक्यता आहे. इतर वीस ते पंचवीस जागा जिंकण्याची शक्यता आहे.

इलेक्टोरल एज एक्झिट पोलनुसार 288 पैकी महायुती 118 तर मविआ 150 जागा जिंकण्याची शक्यता आहे. इतर वीस जागा जिंकण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊ जेव्हीसी एक्झिट पोलनुसार 288 पैकी महायुती 150 ते 167 तर मविआ 107 ते 125 जागा जिंकण्याची शक्यता आहे. इतर तेरा ते चौदा जागा जिंकण्याची शक्यता आहे.

एसएएस एक्झिट पोलनुसार 288 पैकी महायुती 127 ते 135 तर मविआ 147 ते 155 जागा जिंकण्याची शक्यता आहे. इतर दहा ते तेरा जागा जिंकण्याची शक्यता आहे.

......................

झी AIच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 129 ते 159, तर मविआला 124 ते 154 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अन्य पक्षांना शून्य ते दहा जागा मिळू शकतात.

मुंबईत 36 पैकी 15 ते 20 जागा अशा आहेत ज्या महायुती किंवा मविआ यांच्यापैकी कोणीही जिंकू शकते. 

ठाणे-कोकण पट्ट्यातील 39 पैकी 23 ते २८ जागा महायुती तर 9 ते 14 जागा मविआ जिंकू शकते.

विदर्भातील 62 पैकी महायुती 32 ते 37 तर मविआ 24 ते 29 जागा जिंकू शकते

मराठवाड्यातील 46 पैकी महायुती 16 ते 21 तर मविआ 24 ते 29 जागा जिंकू शकते

उत्तर महाराष्ट्रातील ३५ पैकी महायुती आणि मविआ यांच्यापैकी कोणीही १५ ते २० जागा जिंकू शकतील.

पश्चिम महाराष्ट्रातील ७० पैकी महायुती २८ ते ३३ तर मविआ ३३ ते ४२ जागा जिंकू शकते 


jaimaharashtranews-logo