Friday, April 18, 2025 01:05:07 AM

"परभणी-बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर सरकारला आमच्याशी गाठ" - जरांगे पाटलांचा इशारा

या षंढांच्या अन् गुंडांच्या कितीही टोळ्या आल्या तरी हा जरांगे आता मागे हटणार नाही<br/>

quotपरभणी-बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर सरकारला आमच्याशी गाठquot - जरांगे पाटलांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांनी आज गुरुवारी पैठण येथे संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी आयोजित मोर्चात राज्य सरकारला इशारा देत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला केला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, "धनंजय मुंडे यांनी जे प्रयोग सुरू केलेत आणि जे षडयंत्र सुरू केलेत, ते आता आपल्या समर्थकांना रास्ता रोको करण्याचे, मोर्चे काढण्याचे व आंदोलने काढण्यास सांगत आहेत. यामागे दुसरे कुणीही नाही. तेच आहेत. पण ते जास्त खोलात जात आहेत हे त्यांना लक्षात येत नाही."

जरांगे पुढे म्हणाले, "तुम्ही संतोष देशमुखांच्या पाठिशी उभे न राहता आरोपींच्या पाठिशी उभे राहण्याचे काम तुमच्या लाभार्थी टोळीच्या माध्यमातून सुरू केले. तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे की, तुमच्या कुटुंबातील कुणी गेले तर आम्हीही असेच मोर्चे काढायचे का?" यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला की, संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत एकही व्यक्ती एक इंचही मागे हटणार नाही.

👉👉 हे देखील वाचा : ४० सुशिक्षित बेरोजगारांना लावला कोट्यावधींचा चुना

 "आम्ही या प्रकरणात आरोपींना सोडणार नाही. विशेषतः परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील आरोपींनाही आम्ही सोडणार नाही." त्यांनी सरकारला इशारा दिला की, "या दोन्ही प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर सरकारला आमच्याशी गाठ आहे."

जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्ला चढवत त्यांना आपल्या लाभार्थी गुंडांच्या टोळ्यांना थांबवण्याचा सूचक इशारा दिला. ते म्हणाले, "धनंजय मुंडे राज्याच्या हितासाठी काम करत आहेत का? तुम्ही संविधानाची शपथ घेतली आहे. पण तुम्ही तुमच्या गुंड टोळीला आमच्याविरोधात आंदोलन करण्यास सांगता. आरोपींना साथ देता. धनंजय मुंडे यांची चाललेली दिशा चांगली नाही. हे सुरू राहिले तर सर्व जाती आपापल्या आरोपींच्या पाठीमागे उभ्या राहतील."

👉👉 हे देखील वाचा : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री पवारांची ?

मनोज जरांगे यांनी ओबीसींच्या मागे लपण्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांच्या कथित कृतींचा निषेध केला. ते म्हणाले, "धनंजय मुंडे आपल्या पापांना झाकण्यासाठी ओबीसींचा आसरा घेत आहेत. खून करणारे तुम्ही आणि त्यात ओबीसींना ओढणार, हे कसे चालेल?" जरांगे यांनी स्पष्ट केले की, "आम्ही कोणत्याही जातीला बोललो नाही व बोलणारही नाही, पण गुंडांना सोडणार नाही."

अखेर, जरांगे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, "माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी मागे हटणार नाही. मी न्यायासाठी लढेन. मी अन्याय सहन करणार नाही." ते म्हणाले, "धनंजय मुंडे, तुम्ही फसत चालला आहात आणि फसणारच आहात. मी तुम्हाला २५ तारखेच्या उपोषणात काय दाखवतो ते पाहा."

👉👉 हे देखील वाचा : 'बीड जिल्ह्याचे राजकीय वातावरण बदलणार' पंकजा मुंडे यांचा मोठा गौप्यस्फोट

मनोज जरांगे यांनी त्यांचा ठाम निर्णय स्पष्ट केला आणि सांगितले की, "जर आमच्या वाजवी मागण्या न मानल्या गेल्या, तर आम्ही आंदोलनाची तीव्रता आणू. मराठ्यांना आरक्षणासाठी मी लढणार आहे."

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 


marathi gujarati dispute once again in ghatkopar due to insulting marathi family
तुम मराठी लोग गंदा; घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा पेटला मराठी-गुजराती वाद

गेल्या काही दिवसांपासून घाटकोपरमध्ये गुजराती आणि मराठी या दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Ishwari Kuge

तुम मराठी लोग गंदा घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा पेटला मराठी-गुजराती वाद

मुंबई: मुंबईतील गजबजलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणून घाटकोपर ओळखले जाते. मात्र, या घाटकोपरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुजराती आणि मराठी या दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खासकरून मराठी भाषकांवर होणारा अन्याय, अपमानास्पद वागणूक आणि सामाजिक बहिष्कार यामुळे घाटकोपरमध्ये चिंताजनक वातावरण तयार झाले आहे. सध्या घाटकोपरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये घाटकोपर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चार मराठी कुटुंबीयांवर त्यांच्या खानपानाच्या सवयींवरून अपमानास्पद टीका-टिप्पणी करण्यात आली आहे.

या सोसायटीमध्ये गुजराती, जैन आणि मारवाडी या रहिवाशांची संख्या जास्त आहे. मात्र, इथे राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांना त्यांच्या मांसाहारी जेवणामुळे नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'तुम मराठी लोग गंदे हैं, तुम लोग मच्छी मटण खाते हो', असे आरोप करत शाह नावाच्या व्यक्तीकडून सतत आमचा अपमान होत असल्याचे तिथल्या मराठी रहिवाशांनी सांगितले. ही केवळ भाषेचा आणि संस्कृतीचा अपमान करणारी घटना नसून ती धार्मिक आणि सामाजिक दादागिरीचे हृदयद्रावक उदाहरण बनली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये मराठी कुटुंबीयांना घर भाड्याने देणे किंवा घर खरेदी करण्यासाठी नाकारले जात असल्याच्या घटना सतत समोर येत आहेत. भाषेच्या आधारावर होणारी ही भेदभावाची वागणूक केवळ मराठी समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मुंबईसाठी धोक्याची घंटा आहे.

मराठी कुटुंबांना त्रास दिला तर 4 जणांसाठी 4000 लोक तयार होतील:  
या घटनेची माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते संबंधित सोसायटीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, 'इथून पुढे जर मराठी कुटुंबांना त्रास दिला गेला, तर 4 जणांसाठी 4000 लोक तयार असतील.' मनसेचे राजू पार्टे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट शेअर करत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले.

मनसेंची एंट्री होताच आरोपी लपून बसले:  
मनसे कार्यकर्त्यांची सोसायटीमध्ये एंट्री होताच संबंधित आरोपी समोर न येता लपून बसले. यादरम्यान, इतर काही रहिवाशांनी वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, या प्रकाराचा तीव्र निषेध करत मनसैनिकांनी, 'मराठी समाजावरील अन्याय सहन केला जाणार नाही,' असा ठाम संदेश दिला.

या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मराठी समाजाला त्यांच्या खाद्यसंस्कृतीवरून किंवा भाषेवरून चुकीची वागणूक देण्याचा हा प्रकार स्वीकारण्यासारखा नाही. 'जर वेळीच राज्य सरकारने आणि पोलिस प्रशासनाने अशा घटनांवर कठोर पावले उचलली नाहीत, तर मराठी अस्मितेचा हा लढा आणखी उग्र स्वरूप धारण करेल,' असा इशारा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.