Tuesday, October 22, 2024 12:59:01 PM
20
ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना झाले आहेत.
Tuesday, October 22 2024 11:45:08 AM
महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Tuesday, October 22 2024 10:54:19 AM
राशपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ निवडणूक लढवण्यासाठी हाती तुतारी घेण्याची शक्यता
Tuesday, October 22 2024 08:33:09 AM
भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी सहमती झाली आहे.
Tuesday, October 22 2024 08:18:35 AM
भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत नाशिकच्या देवयानी फरांदे यांचे उमेदवार म्हणून नाव नव्हते.
Monday, October 21 2024 03:41:49 PM
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत फूट पडली आहे.
Monday, October 21 2024 03:30:15 PM
शिवसेनेचे दीपक सावंत बंडाच्या पवित्र्यात आहेत. राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत विधानसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी करत आहेत.
Monday, October 21 2024 01:57:48 PM
नाराज असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाने राज्यातील राजकीय पक्षांना इशारा दिला आहे.
Monday, October 21 2024 01:32:33 PM
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. महायुतीतील भाजपाने पहिल्या यादीतून ९९ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पण मविआकडून अद्याप एकही यादी जाहीर झालेली नाही.
Monday, October 21 2024 01:11:43 PM
निवडक जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीने हातमिळवणी केली असल्याचे वृत्त आहे.
Monday, October 21 2024 12:01:04 PM
भाजपाने चांदवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना संधी दिली आहे. या निर्णयामुळे डॉ. राहुल आहेर यांचे नातलग असलेले केदा आहेर नाराज झाले आहेत.
Monday, October 21 2024 10:44:00 AM
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपाने पहिली यादी जाहीर केली. आता महायुतीतील भाजपाचे मित्र पक्ष अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष त्यांच्या उमेवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता
Monday, October 21 2024 10:21:12 AM
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत ९९ उमेदवारांचा समावेश आहे.
Monday, October 21 2024 09:13:02 AM
जम्मू-काश्मीरमधील गांदरबलच्या सोनमर्गमध्ये अतिरेकी हल्ला झाला. एका बोगद्याचे काम सुरू होते. तिथे खासगी कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत होते. या भागात अतिरेक्यांनी हल्ला केला.
Monday, October 21 2024 08:40:20 AM
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांच्या राशपमध्ये प्रवेश केला.
Saturday, October 19 2024 06:56:54 PM
महायुतीचा जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. ही माहिती मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
Saturday, October 19 2024 06:37:16 PM
कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी राज्यातील बँक कर्मचारी १६ नोव्हेंबर २०२४ रोजी लाक्षणिक संपावर जात आहेत.
Saturday, October 19 2024 06:28:05 PM
विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. याआधी विजया रहाटकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या.
Saturday, October 19 2024 04:34:04 PM
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात गदिमा पार्क समोरुन जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून पाचशे रुपयांच्या नोटा वाहून आल्या आहेत.
Saturday, October 19 2024 04:12:01 PM
धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत शिउबाठाचे आदित्य हे कधी स्वतः तर कधी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना पुढे करुन दिशाभूल करणारी माहिती देत आहेत आणि तथ्यहीन आरोप करत आहेत; - आशिष शेलार
Saturday, October 19 2024 02:09:06 PM
दिन
घन्टा
मिनेट