मुंबई - आमदार निलेश राणे ह्यांनी स्वतःला निवडून दिल्याबाबत जनतेचे आभार मानले आहेत. कुडाळचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आपली जनतेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रसार माध्यमांशी बोलताना राणे 'म्हणले की 10 वर्षानंतर जनतेने मला ही संधी दिली. मी जनतेचे आभार मानतो. राणे कुटुंब हे 1985 पासून महाराष्ट्राचा आणि देशाचा राजकारण सक्रिय आहे. आता वेळ आली आहे कि राणे बंधू महाराष्ट्रासाठी काय करु शकतात हे दाखवण्याची वेळ आली आहे' असं विधान निलेश राणे यांनी केलं.
राणे हे त्यांचा निर्भीड व्यक्तिमत्व आणि बेधडक प्रक्रियासाठी ओळखले जातात. आणि आज देखील बोलताना त्यांची आक्रमकता त्यांचा शब्दात दिसून आली. राणेंनी मागील 10 वर्षांच्या आमदारांवर टीका केली, ज्यांनी आपल्या मतदारसंघाची उपेक्षा केली. त्यांनी पूर्व आमदारांच्या कामगिरीवर देखील टीका केली. "गेल्या 10 वर्षांमध्ये, मागच्या आमदारांनी या मतदारसंघाला ओसाड पाडण्याचं काम केलं. असं निलेश राणे यांचं मत आहे.
राणेंचं शिवसेना उबाठा आणि उद्धव ठाकरेयांच्याशी असलेलं वैर देखील दिसून आलं. उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना राणे म्हणाले, "ठाकरे परिवाराचा पक्ष आता कोकणातून पूर्णपणे साफ झाला आहे. त्यांना कोकणात जागा नाही." यासोबतच, त्यांनी सांगितले की, "कोकणी माणसांना भावनिक बनवून मत घेतले जातात, पण आता कोकणातील माणसांनी वचपा काढला आहे. तसेच राहुल गांधी विषयी बोलताना ते म्हणले "राहुल गांधी नेहमी नेगेटिव्ह राजकारण करत आहेत आणि देशाचे नाव खराब करत आहेत."
शेतकरी आत्महत्ये विषयी देखील राणे बोलले. शेतकरी आत्महत्या बाबत मी सर्व आढावा घेणार आहे, अशी हमी देखील त्यांनी दिली.