Connect with us

Trending

जाणून घ्या ‘कार्तिकी पौर्णिमा’ या दिवसाचे महत्त्व

Published

on

कार्तिक पौर्णिमेला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ किंवा ‘त्रिपुरी पौर्णिमा’ म्हणतात.

हिंदू धर्मात या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो.

बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.

शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ‘देव दिवाळी’ म्हणूनही संबोधलं जातं. या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी, अंगणातात देखील दिव्यांची आरास केली जाते. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात.

हे करा या दिवसाला – 

या खास दिवसाला गंगेत स्नान केल्यानंतर दीपदान केले जाते. ब्रम्हा, विष्णु, महेश, अंगिरा आणि आदित्य या विशेष दिवसाचे महत्त्व मान्य केले आहे. त्यामुळे गंगा स्नान, दीपदान, होम, यज्ञ आणि उपासना करण्याबाबत शास्त्रात नमूद केले आहे.

कार्तिक पूर्णिमा पूजा-विधी –
1. सकाळी उठून ब्रह्मा मुहूर्तमध्ये स्नान करा.
2. जवळची गंगा नदी असल्यास, तेथे स्नान करा.
3. सकाळी सकाळच्या दिशेने तूप किंवा तूप तेल घालून दिवा बनवा.
4. भगवान विष्णुची उपासना करा.
5. श्री विष्णु सहस्त्रनाम वाचा किंवा भगवान विष्णु यांचे मंत्र वाचा.

‘नमो हंस अनंत साहित्य सहंग्य, सहस्त्रक्षक्ष शिरो बहाव
सहस्त्र नाम पुरुष सशतेता, सहस्त्रकोटी युग धरत नमह.’

6. हवन किंवा घरी पूजा.
7. तूप, अन्न किंवा अन्न काहीही देऊ.
8. संध्याकाळी देखील मंदिरात दिवा लावा.

Continue Reading
Comments

India World

ईशा अंबानीच्या विवाह सोहळ्यासाठी दिग्गजांची हजेरी

Published

on

By

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. हा भव्यदिव्य विवाहसोहळा उदयपूरमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक प्रसिद्ध उद्योग, मनोरंजन, राजकारण या क्षेत्रातील मंडळी उदयपूरमध्ये दाखल होत आहेत.

अमेरिकेतील नेत्या हिलरी क्लिंटन यांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. यासोबतच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव, सचिन तेंडुलकर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा-निक, शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान यांच्यासह बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत.

इशा आणि आनंद यांचे लग्न 12 डिसेंबरला होणार असले तरीही विवाह सोहळ्यातील इतर विधींना सुरुवात झाली आहे.

Continue Reading

Entertainment

शाहिद कपूरला पोटाचा कॅन्सर ? कुटुंबीय म्हणतात…

Published

on

By

अभिनेता शाहिद कपूर काही अफवांमुळे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. शाहिदला पोटाचा कर्करोग झाला असून उपचारांसाठी तो मुंबई बाहेर गेला असल्याच्या अफवा सगळीकडे पसरल्या आहेत.

एका वेबसाइटने बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्याला पोटाचा कर्करोग झाला असल्याचे वृत्त दिले होते. त्या वेबसाइटने शाहिद कपूरचे नाव नमूद केले नव्हते. त्यानंतर शाहिद कर्क रोगाच्या उपचारासाठी मुंबई बाहेर गेला असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. एवढेच नव्हे तर शाहिद गेल्या कित्येक दिवसांपासून या आजारावर उपचार घेत असून त्यासाठी तो सध्या मुंबईच्या बाहेर गेला असल्याचे देखील म्हटले जात होते.

या अफवेनंतर शाहिदच्या कुटूंबीयांनी शाहिदला कर्करोग झाला असल्याच्या बातम्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शाहिद कामानिमित्त दोन-तीन दिवस दिल्लीला गेला असून तो लवकरच मंबईला परतणार असल्याचेही स्पष्ट केले. ‘लोक काहीही कसे बोलू शकतात? अशा अफवा येतात कुठून? असे अनेक प्रश्न शाहिदच्या कुटूंबींनी उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Continue Reading

Entertainment

बसंतीने वीरूंना ‘अशा’ दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Published

on

By

धर्मेंद्र आज  (8 डिसेंबर) त्यांच्या 83वा वाढदिवस साजरा करत आहेत. याही वयात धर्मेंद्र बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. लवकरच त्यांचा ‘यमला पगला दिवान 3’ सिनेमा येणार आहे. आजचा दिवस ड्रीम गर्लसाठी अत्यंत स्पेशल असून त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

ड्रीम गर्ल अर्थात हेमा मालिनी आणि बाॅलीवूड सुपरस्टार धर्मेंद्र हे सर्वात रोमॅंटिक कपल्स आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यामुळेच त्यांची रियल लाईफ प्रेमकथा ही एकदम फिल्मी आहे. हेमा मालिनी यांनी आपल्या ‘Hema Malini – Beyond The Dream Girl’ या बायोग्राफीत धर्मेंद्रसोबतचे नातं विस्तारीत रूपात मांडलं आहे.

1970 पासून 2011 पर्यंत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 33 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘शोले’, ‘जुगनू’, ‘चरस’, ‘प्रतिज्ञा’, ‘सीता और गीता’ असे हिट चित्रपट गाजवले आहेत.

या दोघांचा पहिला चित्रपट ‘तुम हसीन मैं जवां है’, 24 जुलै 1970ला प्रदर्शित झाला होता.

हेमा मालिनी यांनी ट्विटरवर धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच ‘धर्मेजींच्या वाढदिवसाबद्दल मला शुभेच्छा पाठविणाऱ्या सर्व असंख्य चाहत्यांचे आभार मानले आहेत’ आणि ‘मी तुमच्या शुभेच्छांबद्दल त्यांना निश्चितपणे सांगेन’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Hema Malini

@dreamgirlhema

Happy Birthday to my everlasting love, the dearest father to my darling girls & proud grandfather to Darien & Radhya.
I thank all the numerous fans who are sending their greetings to me on Dharamji’s birthday & I will definitely convey their wishes to him🙏

1,038 people are talking about this

Continue Reading

Poll

विधानसभा निवडणुकींचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, असं वाटतंय का?

Cricket Score Cards

Name POS Played Won Lost Points NRR

WI

1 3 3 0 6 2.9

ENG

2 3 2 0 5 2.269

SL

3 4 1 2 3 -1.171

SA

4 3 1 2 2 -0.914

BAN

5 3 0 3 0 -2.162

AUS

1 3 3 0 6 2.946

IND

2 3 3 0 6 1.634

NZ

3 3 1 2 2 -0.217

PAK

4 4 1 3 2 -0.987

IRE

5 3 0 3 0 -2.905
Name POS Played Won Lost Points NRR
Advertisement

Trending