उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्यावारी दौऱ्यावर

राजकारण्यांपासून सर्व सामान्यांचं लक्ष लागलेल्या अयोध्या दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसह संपूर्ण ठाकरे परिवार अयोध्यावारी करणार आहे. सकाळीच ठाकरे परिवार अयोध्येला रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत सचिव मिलिंद नार्वेकरही असतील. स्पेशल चार्टर विमान मुंबई विमानतळावरुन दुपारी 12 वाजता उड्डाण घेणार आहे.

दुपारी 2 वाजता ते फैजाबाद विमानतळावर दाखल होणार आहेत. अयोध्येत अनेक हिंदुत्ववादी संघटना आज एकत्र येणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल होणार आहेत. अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

नाशिकहून अयोध्येकडे निघालेली जय श्रीराम एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री १० वाजता फैजाबादमध्ये दाखल झाली. तब्बल ३१ तासांचा मोठा प्रवास करुन हे शिवसैनिक अयोध्येत पोहोचले आहेत. यामध्ये वारकऱ्यांचाही समावेश आहे.

असे आहे नियोजन –

  • चार्टर विमानाने दुपारी 12 वाजता मुंबईहून अयोध्येकडे उड्डाण करणार
  • त्यानंतर दुपारी २ वाजता ते फैजाबाद विमानतळावर उतरतील.
  • त्यानंतर लक्ष्मण किला येथे साधूसंतांचे ते अशिर्वाद घेणार
  • त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शरयू आरती करणार
  • त्यानंतर २५ नोव्हेंबरला (रविवारी) उद्धव ठाकरे सहपरिवार सकाळी ९ वाजता रामलल्लाचे दर्शन घेतील.
  • दरम्यान, एका सभेद्वारे उपस्थितांना ते संबोधित करणार

अयोध्येत उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखवणार?

Exclusive : राममंदिर प्रकरणाला जाग, अयोध्या झाली महाग!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *