‘देसी गर्ल’च्या शाही विवाह सोहळ्यात प्राण्यांचा छळ, ‘पेटा’ने नोंदविला आक्षेप

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा शाही विवाहसोहळा जोधपूरमधील उमेद भवन येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात प्रत्येक गोष्ट खास असावी याकडे निक-प्रियांकाने विशेष लक्ष दिलं होतं. राजेशाही थाटात लग्न करणाऱ्या जोडीच्या लग्नात हत्ती,घोडे या प्राण्यांचा वापर करण्यात आला. मात्र या प्राण्यांच्या वापरामुळे ‘पेटा’ या प्राणी सुरक्षा संस्थेने तीव्र नाराजी व्यक्त करत आक्षेप नोंदविला आहे.

प्रियांका-निकच्या लग्नात हत्ती आणि घोड्यांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पेटाने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत या घटनेवर आक्षेप नोंदवला आहे. पेटाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लग्नात प्राण्यांवर कशाप्रकारे अत्याचार होतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कशाप्रकारची साधने वापरली जातात हे दाखविण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच या साऱ्याचा प्राण्यांवर होणारा परिणामही त्यात स्पष्टपणे दाखविण्यात आला आहे.

‘लग्न हा तुमच्यासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असेल.पण प्राण्यांसाठी तो अत्यंत वाईट दिवस असतो. या दिवशी त्यांचे अतोनात हाल होत असतात’, असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलं आहे. दरम्यान, पेटाने केलेल्या या ट्विटवर निक प्रियांका काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. विशेष म्हणजे प्रियांका-निकने लग्नात फटाक्यांची आतिषबाजी केल्यामुळे यापूर्वीच निक-प्रियांका दोघेहे सोशल मिडीयावर चांगलेच ट्रोल झाले होते.

Embedded video

PETA India ❤️❤️

@PetaIndia

Dear @priyankachopra and @nickjonas. Eles 4 weddings live n chains & horses r controlled w whips, spiked bits. Ppl r rejecting ele rides: https://www.youtube.com/watch?v=Omror-75zC0&t=1s  & having horse-free weddings. Congrats, but we regret it was not a happy day for animals.

258 people are talking about this

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *