Connect with us

Diwali 2018

दुबईच्या ‘एमीरेट्स एअरलाइन्स’चं विशेष दिवाळी सेलिब्रेशन

Published

on

दिवाळी हा सण लोक सर्वत्र उत्साहाने साजरा करत आहेत. एमीरेट्स एअरलाइन्स ही दुबईची विमान कंपनी असून या एअरलाइन्सने युएईमधील लोकांना एका वेगळ्या अंदाजात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

airline3.jpg

 

मिठाईने भरलेला ट्रक दुबईच्या प्रसिद्ध बॉलीवुड पार्क आणि सिटी वॉकमध्ये उभा होता. लोकांना आश्चर्यचकित करत यावेळी एअरलाइनच्या क्रूने उपस्थित लोकांना खास भारतीय मिठाई वाटल्या.

 

airline2.jpg

7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2018 या काळात दीपावली दरम्यान दुपारी प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी विशेष खानपानाचे आयोजन केले आहे. इकोनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या ग्राहकांना “मोतीचूर लाडू, तसेच ताज्या गरम आहाराचा आनंद घेता येणार आहे. ‘बिझनेस’आणि’फर्स्ट क्लास’ प्रवाशांनाही अंजीर रोल या मिठाईचा आनंद घेता येणार आहे.

 

airelines1.jpg

Embedded video

Emirates Airline

@emirates

This year, we are celebrating the Indian festival of lights like never before. Emirates wishes you a vibrant, joyful and prosperous Diwali.

255 people are talking about this

Diwali 2018

दिवाळी पाडवा: जाणून घ्या ‘याचे’ महत्व

Published

on

By

अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बळीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बळीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागेदेखील या घटनेचा प्रमुख आधार आहे.

परंपरेनं पती आणि पत्नी यांनी परस्परांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवं, अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे. मनाचा खेळ वेगळा झाला असून, एकमेकांत समज-गैरसमजांमुळे मनाला व्याधी होताना दिसते. पुराणकालीन हे संस्कार, प्रथा जर पाळल्या तर हे अनर्थ टळण्यास मदत होते आणि हाच विचार शास्त्राचा असावा.
पाडव्यामध्येही प्रेम आणि सुविचार यांचा मेळ शास्त्राने केला असून, आज त्याची आवश्यकता अधिक वाटते.

पती-पत्नी एकमेकांना भेटवस्तू देऊन संबंध दृढ करण्याचे संस्कार म्हणजे पाडव्याची ओवाळणी आणि त्यानिमित्त आदरभाव वाढवणे. बदलत्या काळातल्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेत पती-पत्नीच्या नात्यांचे आयाम बदलत चालले आहेत आणि तरीही पाडव्याच्या ओवाळणीमागची भावना मात्र तशीच बावनकशी सोन्यासारखी अस्सल लखलखीत स्नेहाची, प्रेमाची आहे. ती तशीच टिकून राहावी म्हणून एकमेकांना आहोत तसं स्वीकारणं, एकमेकांच्या सामर्थ्यांविषयीचं कौतुक करणं, एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांना गृहीत न धरणं, एकमेकांना अवकाश देणं, घरामध्ये काही मूल्य आणि उद्दिष्टं यांची एकत्रित जपणूक करणं अशा काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात.

वस्त्रालंकारांनी सजलेली पत्नी हातात तबक घेऊन आपल्या पतीला ओवाळते आणि पती त्याच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून तिला पाडव्याच्या दिवशी ओवाळणी म्हणून तिची आवडती एखादी भेटवस्तू देतो.

Continue Reading

Diwali 2018

दिवाळीनिमित्त संयुक्त राष्ट्रांकडून विशेष पोस्टल स्टॅम्प जारी

Published

on

By

यावर्षी दिवाळी उत्सव साजरा करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांनी दिवाळीनिमित्त विशेष पोस्टल स्टॅम्प जारी केले असून या उत्सवाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हे डिझाइन केलेले आहे.

या विशेष पत्रिकेसाठी बुधवारी संयुक्त राष्ट्रांनी भारतीय संघाचे आभार मानले. हे पत्रक 19 ऑक्टोबरला बाहेर आले होते.

या पत्रकात 1.15 डॉलर्सच्या किंमतीचे 10 स्टॅम्प होते. प्रत्येक स्टॅम्पमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत. तसेच या पत्रकात युनायटेड नेशन्सची इमारत हिरव्या आणि निळ्या रंगात प्रकाशित केली गेली आहे, ज्यावर ‘हॅपी दिवाळी’ असा संदेश देण्यात आला आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विट करत यूएन स्टॅम्पला धन्यवाद म्हटले आहे.

Syed Akbaruddin

@AkbaruddinIndia

The struggle between Good & Evil happens everyday @UN

Thank you @UNStamps for portraying our common quest for the triumph of Good over Evil in your 1st set of Diwali stamps on the occasion of the auspicious Festival of Lights

2,303 people are talking about this

Continue Reading

Diwali 2018

‘या’ गावात 130 वर्षांपासून प्रदूषण रहित दिवाळीचा संकल्प

Published

on

By

दिवाळी म्हणजे रोषणाई, उल्हास, उत्सवाचा सण आहे. प्रत्येकजण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तसेच दिवाळीत लहानमुले फटाके फोडण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. मात्र या फटाक्यांमुळे वायु प्रदुषणात वाढ होते. या दिवाळीत वायू प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिला आहे की यंदा विक्रीसाठी केवळ हरित फटाक्यांनाच परवानगी दिली जाईल ज्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि फटाक्यांवर बंदी घालण्यात येईल.

आपल्याला वाटते की हरित फटाके ही एक नवीन संकल्पना आहे, मात्र आसाममधील एका गावात 130 वर्षांपासून हरित फटाक्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. या गावामध्ये हरित फटाके फोडूनच दिवाळी साजरा केली जाते. आसाम मधील ‘गणक कुची’ हे गाव एका अद्वितीय फॉर्म्युलासह फटाके तयार करीत आहे. ज्यांमुळे कमी आवाज येतो तसेच हानिकारक रसायने सोडत नाहीत.

“आमची उत्पादने जवळजवळ हरित फटाक्यांसारखीच आहेत. आम्ही उच्च प्रदूषणकारक सामग्री वापरत नाही म्हणून कमी प्रदूषण होत आहे, परंतु आम्हाला तज्ञ आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, ज्यामुळे आमच्यासारख्या स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, “असे पारंपारिक फटाके बनवणाऱ्यांचे म्हणणे आहे.

आसामने या हरित फटाक्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आणि आता हरित फटाके बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया हाताने तयार केली जात आहे परंतु गावात संपूर्ण प्रक्रिया मशीन-आधारित बनविण्याचा प्रयत्न येथील गावकरी करत आहेत.

यासारख्या गावांनी संपूर्ण भारतासाठी एक उदाहरण मांडले आहे तसेच लोकांनी निसर्गाची आणि पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. अशी शिकवणही दिली आहे.

Continue Reading

Poll

विधानसभा निवडणुकींचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, असं वाटतंय का?

Cricket Score Cards

Name POS Played Won Lost Points NRR

WI

1 3 3 0 6 2.9

ENG

2 3 2 0 5 2.269

SL

3 4 1 2 3 -1.171

SA

4 3 1 2 2 -0.914

BAN

5 3 0 3 0 -2.162

AUS

1 3 3 0 6 2.946

IND

2 3 3 0 6 1.634

NZ

3 3 1 2 2 -0.217

PAK

4 4 1 3 2 -0.987

IRE

5 3 0 3 0 -2.905
Name POS Played Won Lost Points NRR
Advertisement

Trending