Connect with us

Uncategorized

भुताटकीचा उत्सव ‘हॅलोविन’!

Published

on

हॅलोविन उत्सवाची क्रेझ आता भारतातही वाढायला लागली आहे. अमेरिका, युरोपमध्ये अनेक वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भुतांचा भीतीदायक पोशाख परिधान करण्याची पद्धत असते. या काळात भूतं आणि आत्मे जमिनीवर वावरत असतात, अशी मान्यता आहे. त्यावेळी आपण भुताटकीचं रूप धारण केल्यास खरी भूतं आपल्या जवळ फिरकत नाही, असं मानलं जातं.

 

या हॅलोविन सणात भुतांचा पोशाख करुन वेगवेगळे भयानक मुखवटे लावून आनंदोत्सव साजरा करतात.

चित्रविचित्र घाबरवणारा मेकअप या वेळी केला जातो.

त्याचप्रमाणे भोपळ्यावर नाक, डोळे, तोंड कोरुन आतमध्ये मेणबत्ती पेटवली जाते.

या दिवशी लहान मुलं ‘ट्रिक ऑर ट्रिट’ म्हणत घरोघरी जाऊन चॉकलेट्स मागतात.

halloween-hero-1.jpg

भारतातही आता या सणाचा आनंद लूटला जाऊ लागलाय. वेगवेगळ्या ठिकाणी खास हॅलोविन पार्ट्यांचं आयोजन करण्यात येतं. मुंबईजवळच्या कर्जत येथील कलोटे मोकाशी परिसरातील सबरवाल फार्मवर हॅलोविन सणांची धमाल लोकांना अनुभवता आली.

IMG_20181027_185236.jpg

या ठिकाणी जाताना प्रथम राफ्टिंग बोटच्या साहाय्याने नदी ओलांडून कॅम्पवर पोहोचावं लागलं. कॅम्पवर डेकोरेशनही भूताटकीची वातावरणनिर्मिती करणारं होतं. त्यातून ओपन थिएटर मध्ये हाॅरर सिनेमाही दाखवण्यात आला. रात्री बार्बेक्यू डिनर, रात्री जंगलात थरारक ट्रेकिंगची मजाही लुटण्याची सोय करण्यात आली होती.

WhatsApp_Image_2018-10-29_at_11.33.50_AM.jpeg

 

सकाळी हॉर्स रायडिंग, आणि पर्यटकांसाठी मासेमारी करण्याची सोय देखील याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली होती. खेळण्यासाठी बॅडमिंटनसह विविध प्रकारचे खेळ उपलब्ध करुन देण्यात आले होते.

IMG_20181027_174504.jpg

भूतांशी संबंधित असला, तरी हा उत्सव आनंदासाठी आणि मजा म्हणूनच साजरा केला जातो. काही ‘हटके’ मेक-अप आणि गेट-अप करून लोकांना घाबरवण्याची मजा या उत्सवाच्या निमित्ताने करायला मिळते. त्यामुळेच हा उत्सव केवळ पाश्चात्य देशांपुरता मर्यादित न राहाता आता भारतातही लोकप्रिय होतोय.

Continue Reading
Comments

Breaking News

बीएसएफमधील जेवणाची तक्रार करणाऱ्या ‘त्या’ जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

Published

on

By

लष्करातील जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून, त्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिणारे जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. 22 वर्षाच्या रोहित यादवचा मृतदेह रेवाडीच्या शांती विहार परिसरातील घरात आढळला. याप्रकरणी पोलीस तपास करत असून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

काही दिवसांपू्र्वी जम्मू-काश्मीरमध्ये देशाचं रक्षण करणाऱ्या बीएसएफच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाबद्दल यादव यांनी प्रश्नचिन्हे उपस्थित केले होते. तसेच याबाबतचे पत्रही त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिले होते. या गोष्टीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. या व्हिडिओची आणि यादव यांच्या पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने संबंधित तुकडीच्या वरिष्ठांना जाब विचारणारे पत्र लिहिले होते. यामुळे तेज यादवचा नंतर छळ करून त्यांना बीएसएफमधून सस्पेंड करण्यात आले होते.

यादव यांचा मुलगा दिल्लीत शिक्षण घेत असून तो काही दिवसांसाठी घरी आला होता. यादव सध्या प्रयागराजच्या कुंभमेळ्याला गेले आहेत. त्यांची पत्नी संध्याकाळी कार्यालयातून घरी आली असता तिने रोहितच्या खोलीचे दार वाजवले. पण तो दरवाजा उघडत नव्हता. तेव्हा दार जोरात ढकलल्यावर पलंगावर रोहितचा मृतदेह तिला आढळला. रोहितच्या हातात पिस्तूल होते. या पिस्तूलानेच स्वत:ला गोळी मारून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिल लक्षणे दिसत आहेत. पण ही पिस्तूल नक्की कोणाची आहे ? याबद्दल मात्र शंका व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Continue Reading

Uncategorized

छत्रपती संभाजीराजे यांचा 339 वा राज्यभिषेक सोहळा संपन्न

Published

on

By

पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथील श्री क्षेत्र छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळीं आज समस्त शंभू महाराज भक्तांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या 339 व्या राज्यभिषेक सोहळ्यासाठी येथे गर्दी केली होती. 339 व्या राज्यभिषेका साठी आज तुळापूर नगरी सकाळ पासून सजली होती. पहाटे पासून शंभू भक्तांची पावले आज तुळापूर कडे वळताना दिसली. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून शंभू भक्त आपल्या राज्याला अभिवादन करण्यासाठी जमला होता. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. शंभू भक्तांनी संभाजी महाराज यांच्या पालखीची संपूर्णतुळापूर गावामधून गावप्रदक्षिणा करण्यात आली.

निवडणूक जस जशी जवळ येवू लागली तस राजकीय लोकानां गड़ किल्ले अठवायल सुरवात झाली. आज संभाजी महाराज यांच्या 339 व्या राज्यअभिषेक दिनाचे औचित्य साधत अजित पवार नितेश राणे यानी तुळपुर समाधी स्थळी भेट दिली. हजोरोंच्या संख्येने शिवभक्त आले होते. मोठी मिरवणूक काढत कार्यक्रमाचे नियोजन केले होते. अनेक मान्यवर लोकांचे सत्कारही करण्यात आले.

गेल्या कित्येक वर्षांपासून समाधीस्थळ असेल किंवा गड किल्ले दुर्लक्षित आहेत. त्यासाठी फक्त आश्वासन मिळत असल्याचे सांगत कोणीही काही करत नसल्याची खंत संयोजक यानी व्यक्त केली.

Continue Reading

Entertainment

‘हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो

Published

on

By

अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप-खुरानाला 2018ला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले. ताहिराने तिच्या या आजारपणाची माहिती स्वत: सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर तहिरावर उपचार सुरु करण्यात आले. ताहिराची शेवटी किमोथेरपी 5 जानेवारीला करण्यात आली होती. ताहिराने या थेरपीपूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ताहिरा प्रचंड खुश दिसत होती. त्यानंतर ताहिराने पुन्हा तिचे नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने तिचे पूर्णपणे केस कापल्याचे दिसून येत आहे.

ताहिराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ताहिरा खुश आणि आनंदी दिसत असून तिने मुंडण केल्याचे दिसून येत आहे. किमोथेरपीमध्ये रुग्णाला त्याचे केस गमवावे लागतात. थेरपी सुरु असताना रुग्णाचे केस गळत असतात. त्यामुळे ही थेरपी करत असताना ताहिरालाही या प्रसंगाला सामोरे जावे लागले. मात्र केस पूर्णपणे कापल्यानंतरही मी पूर्वीसारखीच खूश आणि आनंदी आहे, असे ताहिराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मी ताहिरा कश्यप. हो तिच पूर्वीची ताहिरा, पण नव्या अंदाजात, नव्या रुपात. सततच्या थेरपी आणि त्याच त्याच डेली रुटीनमुळे कंटाळले होते. त्यामुळे हा नवा लूक केला आहे. माझा हा लूक कसा वाटतोय ते नक्की सांगा’, असे ताहिरा म्हणाली.

पुढे ती असेही म्हणाली, ‘मला माझे सगळे केस कापावे लागतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण ते मी केले आहे. मात्र तरीही आनंदी आहे’.तर ताहिराचं हे ट्विट आयुष्मानने रिट्विट करत तिला ‘हॉटी’ असे म्हणत त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही तिला ‘हॉट’ दिसत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, ताहिरा कॅन्सरशी लढत असतानादेखील तिने तिच्या आगामी सिनेमाची तयारी सुरु केली आहे. सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये विलंब होऊ नये यासाठी ताहिरा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे

Continue Reading

Poll

विधानसभा निवडणुकींचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, असं वाटतंय का?

Cricket Score Cards

Name POS Played Won Lost Points NRR

WI

1 3 3 0 6 2.9

ENG

2 3 2 0 5 2.269

SL

3 4 1 2 3 -1.171

SA

4 3 1 2 2 -0.914

BAN

5 3 0 3 0 -2.162

AUS

1 3 3 0 6 2.946

IND

2 3 3 0 6 1.634

NZ

3 3 1 2 2 -0.217

PAK

4 4 1 3 2 -0.987

IRE

5 3 0 3 0 -2.905
Name POS Played Won Lost Points NRR
Advertisement

Trending