Connect with us

Entertainment

शाहिद कपूरला पोटाचा कॅन्सर ? कुटुंबीय म्हणतात…

Published

on

अभिनेता शाहिद कपूर काही अफवांमुळे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. शाहिदला पोटाचा कर्करोग झाला असून उपचारांसाठी तो मुंबई बाहेर गेला असल्याच्या अफवा सगळीकडे पसरल्या आहेत.

एका वेबसाइटने बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्याला पोटाचा कर्करोग झाला असल्याचे वृत्त दिले होते. त्या वेबसाइटने शाहिद कपूरचे नाव नमूद केले नव्हते. त्यानंतर शाहिद कर्क रोगाच्या उपचारासाठी मुंबई बाहेर गेला असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. एवढेच नव्हे तर शाहिद गेल्या कित्येक दिवसांपासून या आजारावर उपचार घेत असून त्यासाठी तो सध्या मुंबईच्या बाहेर गेला असल्याचे देखील म्हटले जात होते.

या अफवेनंतर शाहिदच्या कुटूंबीयांनी शाहिदला कर्करोग झाला असल्याच्या बातम्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शाहिद कामानिमित्त दोन-तीन दिवस दिल्लीला गेला असून तो लवकरच मंबईला परतणार असल्याचेही स्पष्ट केले. ‘लोक काहीही कसे बोलू शकतात? अशा अफवा येतात कुठून? असे अनेक प्रश्न शाहिदच्या कुटूंबींनी उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Breaking News

‘करणी’चं आव्हान, ‘मणिकर्णिके’चं प्रतिआव्हान!

Published

on

झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमावर आधारित कंगना राणावतचा ‘मणिकर्णिका – द – क्वीन ऑफ झांसी’ हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. मात्र करणी सेनेने या सिनेमाला विरोध केला आहे. सिनेमाच्या निर्मात्यांना करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने आक्षेप नोंदवत पत्र पाठवले आहे.

सिनेमात आक्षेपार्ह दृश्य दाखवल्यास निर्मात्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पत्राद्वारे दिला गेला. एवढंच नव्हे, तर करणी सेनेने कंगनाला थेट अॅसिड हल्ल्याचीही धमकी दिली आहे. मात्र कंगना राणावतने या धमक्यांना प्रत्युत्तर देत आपणही राजपूत असून तुम्हाला बरबाद करून टाकू असं म्हटलं आहे.

करणी सेनेचा आरोप –

राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सिनेमात करण्यात आला आहे.

सिनेमात एका गाण्यात राणी लक्ष्मीबाई यांना नृत्य करताना दाखवले आहे.

सभ्यतेला धरुन नसल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे.

आपण ज्यांना राजमाता मानतो, त्यांना अशा प्रकारे नृत्य करताना दाखवणं आपल्याला मान्य नसल्याचं करणी सेनेने म्हटलंय.

कंगनाने दिले प्रतिआव्हान –

करणी सेनेच्या धमकीने कंगना राणावतने मात्र न घाबरता आपला मुद्दा स्पष्ट केलाय. ‘Manikarnika- The Queen of Jhansi’ या सिनेमाला सेन्सॉरने प्रमाणपत्र दिलं आहे. चार इतिहासकारांनी आणि सेन्सोर बोर्डने या सिनेमाला हिरवा कंदील दाखवला असताना करणी सेनेच्या विरोधाचे काय कारण, असा सवाल कंगनाने केला आहे.

“करणी सेनेने मला धमक्या देणे बंद केले नाही तर मी एकालाही सोडणार नाही, मी देखील एक राजपूत आहे हे त्यांनीही लक्षात ठेवावे. मी तुमची वाट लावून टाकेन” अशी प्रतिधमकीच कंगनाने करणी सेनेला दिली आहे.

यावर करणी सेेनेने पुन्हा धमकी देत आपण जातपात पाहत नसून हिंदू धर्म आम्ही मानतो. त्याचा जर अपमान केला तर आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. एवढंच नव्हे, तर कंगना राणावतवर अॅसिड फेकण्याचीही धमकी दिली आहे.

या आधीसुद्धा करणी सेनेने ‘पद्मावत’ सिनेमाला विरोध केला होता. त्यामुळे संजय लीला भन्सालीला त्यांच्या सिनेमाचे नाव ऐनवेळेस बदलावे लागले होते.

Continue Reading

Entertainment

‘हो मी तिच पण नव्या रुपात’, तहिराने शेअर केला नवा फोटो

Published

on

By

अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप-खुरानाला 2018ला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले. ताहिराने तिच्या या आजारपणाची माहिती स्वत: सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर तहिरावर उपचार सुरु करण्यात आले. ताहिराची शेवटी किमोथेरपी 5 जानेवारीला करण्यात आली होती. ताहिराने या थेरपीपूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ताहिरा प्रचंड खुश दिसत होती. त्यानंतर ताहिराने पुन्हा तिचे नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने तिचे पूर्णपणे केस कापल्याचे दिसून येत आहे.

ताहिराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ताहिरा खुश आणि आनंदी दिसत असून तिने मुंडण केल्याचे दिसून येत आहे. किमोथेरपीमध्ये रुग्णाला त्याचे केस गमवावे लागतात. थेरपी सुरु असताना रुग्णाचे केस गळत असतात. त्यामुळे ही थेरपी करत असताना ताहिरालाही या प्रसंगाला सामोरे जावे लागले. मात्र केस पूर्णपणे कापल्यानंतरही मी पूर्वीसारखीच खूश आणि आनंदी आहे, असे ताहिराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मी ताहिरा कश्यप. हो तिच पूर्वीची ताहिरा, पण नव्या अंदाजात, नव्या रुपात. सततच्या थेरपी आणि त्याच त्याच डेली रुटीनमुळे कंटाळले होते. त्यामुळे हा नवा लूक केला आहे. माझा हा लूक कसा वाटतोय ते नक्की सांगा’, असे ताहिरा म्हणाली.

पुढे ती असेही म्हणाली, ‘मला माझे सगळे केस कापावे लागतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण ते मी केले आहे. मात्र तरीही आनंदी आहे’.तर ताहिराचं हे ट्विट आयुष्मानने रिट्विट करत तिला ‘हॉटी’ असे म्हणत त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही तिला ‘हॉट’ दिसत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, ताहिरा कॅन्सरशी लढत असतानादेखील तिने तिच्या आगामी सिनेमाची तयारी सुरु केली आहे. सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये विलंब होऊ नये यासाठी ताहिरा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे

Continue Reading

Entertainment

‘बाळासाहेब- सोनू निगम कनेक्शन’वर सोनू निगमची प्रतिक्रिया…

Published

on

By

माजी मुख्यमंत्री नमारायण राणे यांचा मुलगा नीलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हत्येचे आरोप करून खळबळ उडवून दिली. यावेळी त्याने बाळासाहेब ठाकरे यांनी गायक सोनू निगम याला हत्येचेही अनेकवेळा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मात्र बाळासाहेब हे सोनू निगमची हत्या करण्यासाठी का प्रयत्नशील होते, याबद्दल खुलासा नीलेश राणे यांनी स्वतः केला नाही. उलट याबद्दल सोनू निगम यांनाच विचारा असं उत्तर त्यांनी दिलं. तसंच जर सोनू निगम यांना उत्तर द्यायची भीती वाटत असेल, मात्र आता बाळासाहेब हयात नाहीत, त्यामुळे आता सोनू निगम कदाचित उत्तर देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

यासंदर्भात पत्रकारांनी सोनू निगमला एका कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारला. बाळासाहेब ठाकरे यांनी तुझ्या हत्येचा कट रचला होता का, असा सवालच सोनू निगमला पत्रकारांनी विचारला. मात्र त्यावर सोनू निगम याची प्रतिक्रिया गोंधळवून टाकणारी होती.

पत्रकारांनी बाळासाहेबांसंदर्भातील प्रश्न विचारताच सोनू निगमने स्मितहास्य केलं आणि चेहा वेडावाकडा करत त्याने उत्तर टाळलं. मात्र या प्रतिक्रियेचा नेमका अर्थ काय आहे, हे पत्रकारांनाही समजू शकलं नाही. त्यामुळे सोनू निगमचं आणि ठाकरे परिवाराचं नेमकं नातं काय हे उत्तर त्याने दिलं नाही. आणि त्यामुळेच खरोखर बाळासाहेबांनी सोनू निगमच्या हत्येचा कट रचला होता का याचं उत्तर गुलदस्त्यातच राहिलं आहे.

Continue Reading

Poll

विधानसभा निवडणुकींचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, असं वाटतंय का?

Cricket Score Cards

Name POS Played Won Lost Points NRR

WI

1 3 3 0 6 2.9

ENG

2 3 2 0 5 2.269

SL

3 4 1 2 3 -1.171

SA

4 3 1 2 2 -0.914

BAN

5 3 0 3 0 -2.162

AUS

1 3 3 0 6 2.946

IND

2 3 3 0 6 1.634

NZ

3 3 1 2 2 -0.217

PAK

4 4 1 3 2 -0.987

IRE

5 3 0 3 0 -2.905
Name POS Played Won Lost Points NRR
Advertisement

Trending